संस्थेचे सध्याचे प्रकल्प

  • समृद्धी वर्ग : ४ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे वर्ग चालविले जातात. सध्या ३१ वस्त्यांमध्ये वर्ग सुरु आहेत
  • किशोर दर्पण : १३ ते १९ वर्ष वयोगटातील मुलींना सकारात्मक दृष्टी देण्यासाठी हे वर्ग चालविले जातात. सध्या १० वस्त्यांमधील १६० मुली यामध्ये सहभागी आहेत
  • स्मार्ट अभ्यासिका : ई. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर अभ्यासची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प चालविला जातो.
  • नैपुण्य वर्ग : वस्तीमधील मुलांना मार्गदर्शन करून नेतृत्व विकास आणि सेवार्थी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प राबवविला जातो.
  • आरोग्य : वस्तीमधील नागरिकांना आरोग्याची सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प राबवविला जातो.